कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : ग्रामस्थांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून पुसद तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीने १५ वित्त आयोगातून सन २०२२-२३ या योजनेतुन पाच लाख रुपयांचे स्थानिय शांतीधामच्या बाजुला जलशुद्धीकरण संच आरो प्लांट बसविण्यात आले.या जलशुद्धीकरण संचाचे आरो प्लांट चे .आज दि.२८जुन २०२३रोजी लोकार्पण गावातील प्रतिष्ठित नागरिक अनिल पुलाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते,सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे,राघोजी ढोले, तुकाराम चव्हाण, दगडु ढोले,नथ्थु राठोड, शिवाजी चिरमाडे,हरिभाऊ धाड, ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते,महादेव धाड,रमेश ढोले, शिवाजी वानखेडे,विठ्ठल आडे, देविदास गजभार, गजानन आबाळे,माणिक राठोड समस्त ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे,शेषराव जाधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

