नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी महागाव
महागाव : नगरपंचायत अंतर्गत बाजार वसुलीच्या निविदेत गोंधळ करून निविदा पुढे ढकलण्याचा डाव आखण्यात आला बाजार दिवशी वसुली करून ती रक्कम परस्पर हडपण्यात आली असल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी विशाल डहाळे यांनी केला आहे या प्रकरणी चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपले सरकार पोर्टल द्वारे करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे. मागील कित्येक दिवसापासून बाजार वसुलीची निविदा प्रक्रिया रखडली होती त्या कालावधीत महागाव नगरपंचायत चे कर्मचारी वसुली करीत होते शासनाच्या खात्यात पैसे जमा न करता हे पैसे परस्पर कर्मचाऱ्यांनी हडपले बाजार वसुली बाबत माहितीच्या अधिकारात भाजपा पदाधिकारी विशाल डहाळे यांनी माहिती मागितली कालावधी पूर्ण होऊनही माहिती मिळाली नसल्याने अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी नगरपंचायत मध्ये गेले मात्र कर्मचाऱ्यांनी उडवाउडविचे उत्तर देवून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचा संशय अधिक वाढला त्यामुळे बाजार वसुली प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे जिलाधिकारी चौकशी संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


