संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड : तालुक्यातील चोफुला येथे भारतीय जनता पार्टी च्या सोशल मिडिया टीम ची बैठक आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली त्यामध्ये मोदी @ ९ महासंपर्क अभियानाअंतर्गत दौंड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चे, आघाड्यांची संयुक्त मोर्चा बैठक पार पडली, यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात मागील ९ वर्षाच्या या काळात अनेक लोककल्याणकारी योजना, महत्वपूर्ण विकासकामे झाली, कलम ३७० , सर्जिकल स्ट्राईक यासारखे निर्णय, कोरोना काळात १०० कोटी देशवासींयाना कोव्हीड ची लस पुरवठा,तसेच देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे शेकडो धोरणात्मक घेतलेले निर्णय, हि सर्व विकासकामे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. या बैठकीतवेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा सौ. कांचन कुल, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष श्री आनंद थोरात, तालुकाध्यक्ष श्री. माऊली ताकवणे, दौंड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. हरिभाऊ ठोंबरे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष श्री. नामदेव बारवकर भीमा पाटस चे संचालक श्री आप्पासाहेब हंडाळ, श्री. राजेंद्र गवळी, श्री विकास शेलार, श्री तुकाराम ताकवणे, श्री चंद्रकांत नातू , माजी संचालक श्री.संजय इनामके, श्री. धनजीभाई शेळके, श्री. मोहन म्हेत्रे, श्री.उमेश देवकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. बापूराव भागवत, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष श्री. संदेश धायगुडे यांसह भाजपा विविध मोर्चे, आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.