कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : मुख्य चौका चौकात अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचे पॉईंट राज्यरोसपणे अवैध प्रवाशी वाहनाला पोलीस प्रशासनाची मूक संमती कार्यवाही शून् सामान्य माणसाला तसेच लहान शाळेकरी मुला – मुलींना जीव मुठीत धरून गर्दीतून रस्ता शोधावा लागतो. सद्या पुसद शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे शरारत रस्ता निर्मिती कार्य सुरु असून सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्याचा सामना करावा लागत आहे. पुसद शहरातील प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनानी आपले बस्तान मांडले असून भर रस्त्यावर सामान्य नागरिकांना त्रास देत अवैध प्रवासी वाहतूक करणारे एजंट आपली वाहने भरत असतात. अवैध लक्झरी बसेसे अवैध मिनी बसेसे काळी पीवळी, क्रूझर, एपे ऑटो क्षमते पेक्षा जास्त प्रवासी भरून जीवघेनी वाहतूक करत आहे. सदर अवैध प्रवासी वाहतूक करणारे दादागिरी ने मुख्य रस्त्यावर आपले वाहने भरतात तर वाहतूक शाखा पुसद बघ्याची भूमिका बजावत आहे. अवैध प्रवासी वाहतुक करणारे भर रस्त्यावर गाड़ी भरणे त्यांच्या या मनमानी कार्यभारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वेळीच अवैध प्रवासी वाहतुकीला आवर घालन्याची गरज आहे.
प्रत्यक्ष जर आरटीओच्या नियमाने काटेकोर पालन झाले तर बरेचसे वाहने नियम बाह्य झालेली आहेत. ते वाहन कुठलाही फिटनेस परवाना नसताना सुद्धा बिनधास्त चालू आहे. पैसे कमावण्याच्या नादात सामान्य नागरिकाच्या जिवाशी खेळ चालू असताना दिसत आहे. प्रशासन याकडे लक्ष घालेल का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.


