कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : अध्यक्ष पदी कैलास अग्रवाल तर सचिव पदी धिरज बगडे यांची निवड पुसद – राधाकृष्ण मंदिर येथे अग्रवाल मंडळ पुसद ची आमसभा संपन्न झाली यामध्ये 2019 ते 2022 पर्यंत चे कार्यकारणी चा कार्यकाळ संपला असल्याने नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. सभेच्या मंचावर गिरीषजी अग्रवाल , गोपालदासजी अग्रवाल , किरण बगडे , डॉ.कैलास बजाज उपस्थित होते. सुरुवातीला अग्रवाल मंडळ चे अध्यक्ष चंद्रकांत गजबी ने आपले मागील तीन वर्षाचे आलेख सर्वांन समोर ठेवले तसेच कोषाध्यक्ष कैलास गजबी यांनी तीन वर्षाचा हिशेब सर्वांन समोर सादर केला.संचलन संतोष अग्रवाल यांनी केले.
नवीन कार्यकारणी तयार करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया गिरीष अग्रवाल यांनी सांभाळली. नवीन कार्यकारणी साठी सर्वानुमते अध्यक्ष कैलास अग्रवाल ,सचिव धिरज बगडे यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष पदी संतोष अग्रवाल. नविन कार्यकारणी चा कार्यकाळ पुढील तीन वर्षासाठी राहील. अग्रवाल मंडळ पुसद च्या आमसभेला अग्रवाल समाज चे सदस्य , महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवनियुक्त अध्यक्ष कैलास अग्रवाल यांनी अग्रवाल समाजासाठी अनेक महत्वपूर्ण कार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले.