अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : येथील शिवराज गणेश मंडळाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरण,व पोलीस स्टेशनचे अधिकारी तथा कर्मचारी यांचा दिनांक ३ सप्टेंबर रोजी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दि.१६ रोजी शहरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली येऊन तर,काही विजेचे पोल वाकून जिवित हाणी होण्याची दाट शक्यता वाढली होती व उत्सव किंवा मिरवणूकच्या वेळी या तारांचा नेहमीच अडथळा होत होता तसेच शहरातून सातत्याने लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा व वाकलेले पोल व कोटेड केबल लावने अशी मागणी शिवराज गणेश मंडळच्या वतीने २ सप्टेंबरला निवेदनाद्वारे महावितरण उपअभियंता यांना देण्यात आले होते या मागणीची दखल विजवितरणने घेऊन गणेश मंडळाच्या मिरवणूक मार्गावरील लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारां टाईट करून,निकामी पोल व वाकलेले पोल बदलून तेथे नवीन पोल व कोटेड केबल टाकून दुरुस्तीचे काम केले असल्याने मंडळाच्या वतीने सत्कार करन्या आला तसेच शासकीय कंत्राटदार सोनू जिंतूरकर यांनीही दखल घेऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले तसेच मालेगाव पोलीस स्टेशन ने मिरवणूक दरम्यान चोख बंदोबस्त ठेवून अनुचित प्रकार घडला नसल्याने त्यांचेही शिवराज गणेश मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिवराज गणेश मंडळाचे सदस्य योगेश काटेकर,अभि घुगे,आशितोष कंकाळ, योगेश यादव,व्यंकटेश कंकाळ,डॉ.उमेश तारे,अतुल सोभागे,चेतन झ्याटे,सुशील सोमटकर,अंकुश गुजरे,अमोल भालेराव,अक्षय घुगे,अमय अनसिंगकर, प्रतीक खोडके,शैलेश टोकवार,व आदी सह उपस्थित होते.


