हनुमान बर्वे
शहर प्रतिनिधी, वाशिम
वाशिम : वाशिम तालुक्यातील वाशिम कनेरगांव नाका महामार्ग वर राजगाव फाट्यावरू 2 कि मी असलेलं देवठाणा बुद्रुक या गावाला जाण्यासाठी चंद्रभागा पत्रावर छोटा पूल असून. गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी खूपच अडथळा निर्माण होत आहे पावसाळ्यामध्ये थोडाही पाऊस जास्त प्रमाणात पडला की या गावाला ये जा करण्यासाठी खूप कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. देवठाणा या छोट्याशा खेड्यातील 25 ते 50 कामगार मुलं वयस्कर व्यक्ती आपली मोलमजुरी करण्यासाठी वाशिम कनेरगाव नाका येथे नेहमी जा ये करत असतात.तसेच जर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला तर त्यांना गावांमध्ये जाण्याचा एकमेव रस्ता म्हणजे चंद्रभागा पत्रावर उभा असलेला छोटासा पूल हा दुथडी भरून वाहत असतो.पुलाच्या वरती 4 ते 5 फूट पाणी चालू असते.स्वतःचा जीव धोक्यात टाकून नदी पार करत हे कामगार आपल्या घरी जा ये करतात व बऱ्याच वेळेस असं करत असताना दुर्घटना ही घडल्या यामध्ये कधी काळी जीवाला धोका तर कधीकाळी आपल्या वाहनांना धोका असे यांच्या पदरी दरवर्षी च असत पाऊस आला की यांना त्रास सहन करावा लागतो.मुलामुलींना शाळेत जा ये करण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने येथील गावातील नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे.सतत होणाऱ्या पावसामुळे फुलावरून ये जा करता येत नाही त्यामुळे मुला मुलींच्या शिक्षणात येणारा अडथळा व गावात कोणाला अडीअडचणीच्या काळात दवाखान्यात न्यावयाचे असल्यास त्या व्यक्तीला नदि पात्रातील छोट्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूलाही जवळ कराव लागत. एवढ्या समस्यांना सामोरे जावे लागत गावकऱ्यांची एकच मागणी पुलांचे उंचीकरण व्हावे यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सरकारला एकच आव्हान आहे.