विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :मागील दोन दिवसापासून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने उमरखेड महागाव तालुक्यातील सहा महसुली मंडळामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. एका दिवसामध्ये झालेल्या 163 मिलीमीटर पेक्षा जास्त असून आज पर्यंत झालेल्या पर्जन्यमानापेक्षा जास्तीचे आहे. शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे. हळद ऊस सोयाबीन कापूस तुर जनावरांचा चारा अशा सर्व पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना आपण आदेशित करावे .व कास्तकार बांधवांना तात्काळ मदत देण्याबाबत कारवाई करावी अशी विनंती उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सचिव मदत व पुनर्वसन यांच्याकडे केली आहे .


