अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
सतत कुठलेना कुठले संकटाने शेतकरी त्रस्तच असतो.कधी अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पीक हातातून निसटून जाते.तर कधी अतिवृष्टीमुळे कोवळे पीक याची हानी होते.कधी खतासाठी ,बी-बियाण्यांसाठी, त्रस्त असतो.तर कधी पीक विमा मिळवण्यासाठी ताटकळत उभा असतो.उमरखेड तालुक्यातील झालेली अतिवृष्टी यातून ढाणकी शहर अपवाद नाही.सतत दहादिवस कोसळणाऱ्या पावसामुळे ढाणकी येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.बरीच पिके पाण्याखाली गेली व जळाली आहे.संकटे जणू काही शेतकऱ्यांची पाठ काही सोडताना दिसत नाही.मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.तेच नुकसान या वर्षी तरी भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.परंतु निसर्गाच्या या प्रकोपापुढे शेतकरी पूर्णत हतबल झालेला दिसत आहे.आज पुर्णत शेतकरी निराश झालेला दिसत आहे.त्यातच रब्बी ने सुद्धा यावेशी शेतकऱ्याकडे पाठ फिरवली हाता तोंडाशी आलेला घास गारपिटीने उध्वस्त झाला ती उणीव भरून निघते न निघते पुन्हा अवकाळी पावसाचा फटका यातून शेतकरी हा पूर्णत हतबल झालेला दिसत आहे. गारपीटी मुळे रब्बी हंगाम गेल्याची रक्कम ही अतिशय तुटपुंजी होती शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली, अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगाम सोयाबीन, कापूस, तूर,याबरोबर ऊस, व केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पीक काहीच शिल्लक राहिले नसून जग्न मरण्याचा शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी तरी सरकार मायबाप यांनी योग्य रित्या सर्वे करून कोणत्याही प्रकारच्या अटीशर्ती न घालता सरसगट शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान पर मदत देण्यात यावी.असे शेतकऱ्यांच्या वतीने बोलल्या जात आहे.


