विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :तालुक्यातील ढाणकी येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ढाणकी भाजप शहर तर्फे मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना, फळांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष महेश पिंपरवार, ढाणकी भाजपचे शहराध्यक्ष रोहित वर्मा, शहर उपाध्यक्ष महेश शहाणे, नागेश रातोळे, शहर सचिव वैभव कोठारी, प्रशांत पंडितकर, भाजपचे नगरसेवक उमेश योगेवार, साई मंतेवाड व पंकज केशेवाड हे उपस्थित होते.