दिनेश चांभारे
तालुका प्रतिनिधी, हिंगणघाट
हिंगणघाट : तालुक्यातील बोपापुर (पो.)येथे ग्रामपंचायतीने माता मंदिर (नवीन वस्ती) येथे सांडपाण्याचे शोषखड्डे तयार केले आहे.हे शोषखड्डे नागरिकांच्या आरोग्याचा घातक ठरले आहे. शोषखड्डयाचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे केले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.. त्यांच्या सभोवताल कोणत्याही प्रकारची माती किंवा मुरम भरलेला नाही.त्यामुळे पावसाचे पाणी येऊन तेथे साचत आहे .तसेच पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची नालीची व्यवस्था केलेली नाही. शोषखड्ड्याचे पाणी पावसाच्या पाण्यासोबत लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.ग्रामपंचायतीला वारंवार सांगून सुद्धा पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था केलेली नाही. तरी ग्रामपचायतीने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन यावर तोडगा काढण्यात यावा,अशी येथील नागरिकांची मागणी आहे.


