भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: आज शेवगाव याठिकाणी जनशक्ती विकास आघाडी परिवारातील श्री कृष्णा कुसळकर यांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अधिपत्याखाली सन 1992 पासून कार्यरत असलेली स्व-भाग भांडवलावर चालणारी अहमदनगर जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील एकमेव पतसंस्था अशी नावजलेली महाराष्ट्र वीज कामगार सहकारी पतसंस्था मर्या.अहमदनगर या संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध एकमताने निवड झाल्याबद्दल श्री कृष्णा कुसळकर यांचा सत्कार करतानी जि प सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांनी जनशक्तीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार स्वागत केले.या संस्थेवर सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे सन 2023-2028 या वर्षासाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सौ काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील विविध गावच्या विजेच्या प्रश्नासंदर्भात कुसळकर यांच्याशी चर्चा करून शेतकरी वर्गाचे प्रश्न वीज वितरण संस्थेच्या मार्फत सोडविण्याची मागणी केली.यावेळी जनशक्ती परिवारातील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा लक्ष्मण बिटाळ सर,प्राचार्य संपतराव दसपुते,नायब तहसीलदार रवी सानप साहेब,आजिनाथ विघ्ने,प्रा रूपा खेडेकर,विजुभाऊ धोत्रे, किरण कुसळकर,सुरज कुसळकर,गणेश सुपारे,महेश कुसळकर इत्यादी उपस्थित होते.


