अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
वाशिम जिल्हा हा डोंगरदऱ्या खोऱ्याने आणि जंगलाने वेढलेला आहे.येथे सपाट जमिनी कमी प्रमाणात असून शासनाच्या मागेल त्याला शेततळ योजने अंतर्गत येथील शेतकरी अर्ज करतात.मात्र शेततळ सपाट व उथळ किंवा वहिती जमिनीवर घेण्याच्या शासनाच्या नियामामुळे अर्ज केलेल्या गरजू शेतकरी वर्गाला शासन स्तरावर अर्ज करून सुद्धा पात्र आणि गरजू असून डावलण्यात येते किंवा अर्ज नामंजूर केला जातो.त्यामुळे कोरडवाहू जमिनी पाण्याखाली येऊन ओलिताची क्षेत्र वाढवण्याच स्वप्न शेतकऱ्याच भंग होत आहे. उथळ व सपाट जमिनीवर शेततळे घेण्याचा शासनाच्या निर्णयात बदल करावा. कारण अश्या जागेवर ज्या शेतकरी वर्गाने या अगोदर शेततळे घेतले आहे.ते पावसाच्या पाण्यात भरलेच नाही.म्हणुन जिथं शेतातील नाल्या किंवा उताराचा भाग आहे अश्या ठिकाणी देण्यात यावे जेणे करून ते पावसाळ्यात पूर्ण पणे भरेल. वाशिम जिल्हा हा डोंगराळ,हलक्या जमिनीचा व दुष्काळ ग्रस्त जिल्हा असून येथे या योजनेचा लाभ मिळाला.तर येथील कोरडवाहू जमिनी पाण्याखाली येऊन येथील शेतकरी वर्गाची प्रगती होईल. व त्यांची अर्थक्रांति होईल. या साठी शासनाच्या वतीने वाशिम जिल्ह्याचा भौगोलिक परिस्थितिचा अभ्यास करुण वरील निकषात बदल करुण शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांना मेडशी येथील शेतकरी अजिंक्य मेडशीकर यांनी निवेदन द्वारे केली.