संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूलच्या दोन संघाने विजेतेपद पटकावले असून या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाची व १९ वर्षाखालील मुलांच्या संघाची कोल्हापूर विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर याच विद्यालयच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाला व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाला विजयाने हुलकावणी दिल्याने उपविजेत्या पदावरुन समाधान मानावे लागले आहे.तर १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने या स्पर्धेत तृतीय स्थान मिळविले आहे. जिल्हास्तरीय ही स्पर्धा १४,१७ व १९ वर्षाखालील मुलींच्या व मुलींच्या गटात ,कासार्डे हायस्कूलच्या भव्य मैदानावर सलग दोन दिवस सुरू होतो.
या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेले संघाप्रमाणे खेळाडू पुढीलप्रमाणे –
विजेत्या १४वर्षाखाली मुलींच्या संघात-
आकांक्षा आडिवरेकर,आर्या मोडक, आर्या सरवणकर, तृप्ती राठोड, दूर्वा पाटील, पौर्णिमा पवार, भक्ती लाड, रिद्धी राणे, विधी चव्हाण, शिवानी जाधव,साध्वी शेट्ये,सुजाता राठोड या यशस्वी खेळाडूंचा समावेश आहे तर
उपविजेत्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघात-
अश्मेष लवेकर, मंथन ओटवकर, स्वराज साळसकर,अमित चव्हाण, चेतन शिंदे, दक्ष जाधव,नचिकेत पाताडे, शुभम पवार,संदीप राठोड, राज पाटील, उत्कर्ष परब व स्वयं सावंत या खेळाडूंचा समावेश आहे.
तर,तृतीय क्रमांक प्राप्त १७ वर्षा खालील मुलांच्या संघामध्ये-
दुर्वास पवार, विघ्नेश पेडणेकर, अरुण राठोड, शुभम पाताडे, रुक्षराज घुगे, ओमकार चव्हाण, राज कोनाडकर, राम पवार, संतोष गरंडे, किशोर देवासी, आशिष राठोड व दत्तराज केसरकर या खेळाडूंचा समावेश आहे.
विजेत्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघामध्ये –
अर्षद हुलिकेरी, तेजस आईर, दुर्वेश गोसावी, निहार तांबे, परशुराम सावंत, भूपेश सुतार, मंथन बिर्जे, यश रहाटे, प्रथमेश पवार, मयुरेश नारकर, साईराज राठोड व विश्वास चव्हाण या यशस्वी समावेश आहे.
उपविजेत्या ठरलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघामध्ये-
तन्वी खरात, रेणुका कोकरे, वैष्णवी राणे, सानिका मत्तलवार, कस्तुरी मुंडले, मृदुला गोडे, सृष्टी खानोलकर, सेजल सावंत, अक्षता पोयरेकर, दीक्षा जठार, सिद्धी गुरव व सेजल कदम या खेळाडूंचा समावेश आहे.या यशस्वी खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा शिक्षक तथा आट्यापाट्याचे जिल्हा प्रशिक्षक दत्तात्रय मारकड,यशवंत परब, दिवाकर पवार,ऋषिकेश खटावकर,सौ.ऋचा सरवणकर,सौ.पुजा पाताडे,सौ.वैष्णवी डंबे, अवधूत कानकेकर,सागर पांचाळ यांच्यासह क्रीडा विभागातील इतर सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या यशस्वी सर्व संघाचे सिंधुदुर्गाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस मॅडम, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कासार्डे विकास मंडळ,मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक
एन.सी.कुचेकर, जेष्ठ शिक्षिका सौ बी.बी.बिसुरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

