संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
कणकवली तालुक्यातील लोरे गावचे सुहास शिरोडकर यांना एज्युब्रिज इंडिया संस्थेचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे शिरोडकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.पनवेल येथील एज्युब्रीज इंडिया, मुद्रा पुरस्कार यांच्यावतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. नुकतेच स्मार्टोक्रॅब इन्सटीटयुट ऑफ व्होकेशनल स्टडीज या संस्थेच्यावतीने आयोजित ऑनर ऑफ एक्सीलंस मुद्रा गौरव अवाॅर्ड 2023 पार पडले. यामध्ये अनेक गुणिजनंचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात शिरोडकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सुहास शिरोडकर यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण के. जे. सोमैय्या आणि व्यवस्थापन शिक्षण वेलिँगकर संस्थेतून घेतले आहे. तसेच आय आय एम रायपूर या संस्थेतून ऑपरेशन्स मँनेजमेन्ट पूर्ण केले आहे. यांत्रिकी विभागातील सीनसी मशीन, प्रोसेस, प्रोजेक्ट व्यवस्थापन, मशीन शॉप, कॅड/कॅम या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.
ते सध्या नामंकीत कंपनीत इँजिनीअर म्हणून कार्यरत असून , एरोस्पेस क्षेत्रातील, भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DढुRDO) यांच्यासाठी असलेल्या उपक्रमात भाग घेऊन देशसेवेसाठी हातभार लावत आहेत.देशसेवेच्या कर्तव्य भावनेतून केलेल्या सेवेची दखल घेऊन एज्युब्रीज इंडिया संस्थेने सुहास शिरोडकर यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, आयोजित सोहळ्यात, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन अवाॅर्ड , ऑनर ऑफ एक्सीलंस (अभियांत्रिकी विभाग) पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये मानकरी बॅच गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

