प्रमोद अहिनवे
तालुका प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर : तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तान्हाजी तांबे यांचे ओतूर येथील पांढरी मारुती मंदिराच्या खुल्या
व्यासपीठावर चार दिवस सुरु असलेले उपोषण अखेर गुरुवारी(दि.५) ज्युस देवुन सोडविले. आमदार अतुल बेनके यांनी संबधित प्रकाराबाबत जबाबदार असणाऱ्या त्या शिक्षकावर निःपक्षपातीपणे चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केल्यावर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपविभागिय पोलिस अधिकारी पाटील,सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन कांडगे, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा समन्वयक संभाजी तांबे,माजी जि.प.सदस्य मोहीत ढमाले,जुन्नर पं.स.चे माजी सभापती विशाल तांबे,बाजार समितीचे संचालक तुषार थोरात,जयप्रकाश डुंबरे,दयानंद डुंबरे,जालिंधर पानसरे,अमोल म्हसने, जयंत डुंबरे,शशिकांत डुंबरे,आशिष शहा,धोंडिभाऊ पानसरे,अतुल तांबे,सोनल डुंबरे,जालिंदर पानसरे अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत लैंगिक शोषण करणा-या शिक्षकावर संस्था चालक,शिक्षण अधिकारी व पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई न केल्यामुळे (दि.०२) पासुन तान्हाजी तांबे हे उपोषणाला बसले होते. संबंधित शिक्षकावर भा.द.वि.कलम ३५४(ड),बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम १२,माहीती तंत्रज्ञान अधिनियम ६७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन कांडगे यांनी सांगितले.