मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत : भाजपचे महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत भारतीय जनता पक्षाच्या वसमत विधानसभा निवडणूक प्रमुखपदी जिल्हाध्यक्षसौ.उज्वला विजयप्रकाश तांभाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचे पक्षकार्य व जनसंपर्क लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. उज्वला तांभाळे यांच्या नियुक्तीसाठी वसमतमधील भाजप कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीमती उज्वला विजयप्रकाश तांबळे यांच्याकडे महाविजय 2024 अंतर्गत वसमत विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची शेवटची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. भारतीय जनता पक्षाने एका महिलेला एवढी मोठी जबाबदारी देऊन पक्ष वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्यानंतर पक्षात महिला सक्षमीकरणासाठी महिलांना संधी देण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलले आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांसाठी वसमत विधानसभा मतदारसंघात पक्षाने कंबर कसली असून, उज्ज्वला यांच्यावर भाजपची करडी नजर आहे.महिला अधिकारी असे असतानाही उज्वला तांभाळे यांचा महिला व पुरुष कार्यकर्त्यांशी संपर्क असल्याने कार्यकर्त्यांवर होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता मैदानात उतरणारे धाडसी नेतृत्व असून पक्षाने त्यांच्यावर वसमत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.उज्वला तांभाळे यांची निवड जाहीर होताच वसमत येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार, खोब्राजी नरवडे, नाथराव कदम, शिवाजी आलडिंगे, विनायक महाराज, डॉ.अनिल जिंतूरकर, राधाकिशन साधना पाटील, काशिनाथ चव्हाण आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


