पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
रामटेक : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली वन परिक्षेत्रांतर्गत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक पत्रकारांनी सहभाग घेतला. वन्यजीव सप्ताहाबाबत वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरबाहुली वनपरिक्षेत्र 8000 हेक्टर परिसरात पसरलेले असून वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांना वन सहलीवर घेऊन जाणे, वन्यजीव व मानवी संघर्ष थांबवण्यासाठी विद्यार्थी व पत्रकारांना प्रशिक्षण देणे, प्रदूषणमुक्त जंगल अशी संपूर्ण माहिती यावेळी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने दिल्या जाते.











