पंकज चौधरी तालुका प्रतिनिधी रामटेक नागपूर
प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आणि एकलव्य शाळेतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मिशन शिखर उपक्रम हा यावर्षी सुरू करण्यात आला. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जेईई/ नीट परीक्षेचे जवळपास चार महिने मार्गदर्शन शिबिर एकलव्य स्कूल रामटेक येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता प्रकल्प कार्यालय नागपूर अंतर्गत तज्ञ कंत्राटी शिक्षक रोहन खुणे, प्रिया बोरहारे, ऋषभ मेश्राम, कीर्ती रोहोते (M.P.B.C.) यांची नियुक्ती करण्यात आली. यांना मार्गदर्शक प्र. प्राचार्या डॉ.समरीन कौसर अन्सारी यांनी केले.व मिशन शिखरचा विडा यशस्वीरित्या उचलला, नागपूर प्रकल्प अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा आणि एकलव्य शाळेतील एकूण 43 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी पहिल्यांदाच नऊ विद्यार्थ्याने मिशन शिखरमध्ये यश संपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शासकीय आश्रमशाळा कवडस येथील विद्यार्थी कशिश मसराम, दुर्गेश मसराम, गौरव परतेती, प्रिंयका पंधराम असे एकूण 4 व गुरुकुल अनुदानित आश्रम शाळा देवलापार येथील विद्यार्थी 2 सुदर्शन वरखडे, डिंसेग ब्रिअमे, व जयसेवा अनुदानित आश्रम शाळा दाहोदा येथील 1, अहिल्यादेवी होळकर अनुदानित आश्रम शाळा उकळी येथील एक 1, आणि एकलव्य स्कूल रामटेक येथील कु. वैष्णवी कोकडे यासर्वीनी परीक्षेमध्ये सुयश मिळवले.











