प्रमोद अहिनवे तालुका प्रतिनिधी-जुन्नर. ओतुर-छत्रपती शिवरायांच्या 394 व्या जयंतीनिमित्त ओतूर ते जुन्नर आणि पुन्हा ओतूर असे सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष जयसिंग व्ही. डुंबरे आणि सचिव गणेश आ.डुंबरे यांनी दिली.ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने दरवर्षी ओतूर जुन्नर ओतूर अशी सायकल रॅली काढण्यात येते. जुन्नर ला जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे सर्व सायकल स्वार पुन्हा ओतूरला येतात. आतापर्यंत ओतूर सायकल ग्रुपने स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात, गेट वे ऑफ इंडिया, पंढरपूर, शेगाव, जेजुरी, रायगड अशा सायकल यात्रेचे यशस्वी आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच पर्यावरणाचा संदेश देत स्वच्छता आणि रहदारीचे नियम पाळा असा संदेश देत या रॅलींचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या रॅलीमध्ये जवळजवळ सातशे सायकल स्वlरांनी भाग घेतला होता. पाच वर्षापासून ते 70 वर्ष वयापर्यंतच्या सायकल स्वlरांचा यात समावेश होता. सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलिस्ट साठी लकी ड्रॉ चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सायकल बद्दलची आकर्षण वाढावे आणि लोकांनी सायकल चालवावी ही या पाठीमागची संकल्पना होती. यासाठी तालुक्याचे माजी आमदार शरद दादा सोनवणे,मोहित ढमाले, प्रशांत डुंबरे, विशाल तांबे, धोंडीभाऊ मोरे ,मंगेश डुंबरे, चैतन्य ज्वेलर्सचे संतोष डुंबरे,हर्षल भाटे,बालाजी ग्रुपचे जयवंत डुंबरे, सरपंच डॉ. छाया तांबे, धनंजय डुंबरे, ऋषिल डुंबरे, डॉक्टर वैभव गायकर, डॉ. अमोल डुंबरे, डॉ. राहुल तांबे, डॉ. फापाळे, डॉ. अजातशत्रु शिंदे, प्रकाश हिंगणे, सुशील हिंगणे, उर्मिला महाकाळ, दिपाली डुंबरे, वैभव नलावडे, प्रदीप गाढवे, रवींद्र डुंबरे, आदींनी सायकल, टी-शर्ट, घड्याळ, बॅट ,चेंडू, हेल्मेट इत्यादी उपयुक्त साहित्य देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.संतोष डुंबरे, सुभाष लोहॊटे,भाऊसाहेब मुरादे,जयवंत डुंबरे आदींनी गाडीचे आयोजन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.तरी ओतूर सायकल ग्रुपच्या महिलांचेही पूर्ण रॅली मध्ये व हालत्या चालत्या देखव्यासाठी खुप सहकार्य लाभले, ओतूर मधील कवठे यमाई मंदिरात लकी ड्रॉ चा व भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री. छगन पानसरे सर यांनी सर्व सायकल स्वरांना खाऊ वाटप केले. जयसिंग डुंबरे यांनी प्रास्ताविक केले.भाऊसाहेब खाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गणेश डुंबरे यांनी आभार मानले.











