पंकज चौधरी तालुका प्रतिनिधी रामटेक
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर पारशिवनी पोलीस ठाण्यात खोटे कागदपत्रे दिल्याच्या आरोपावरून पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नयाकुंड ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर अवस्थी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पारशिवनी तहसील अंतर्गत 2022-23 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नयाकुंड सरपंच पदाचे उमेदवार सुधीर अवस्थी यांनी दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्राबाबत तहसीलदार पारशिवनी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून हे प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पारशिवनी नायब तहसीलदार प्रकाश हरगुडे यांच्या फिर्यादीवरून पारशिवनी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


