सोनाळा संत्री हा जागतिक ब्रँड बनवणार – सीईओ सुनील शेळके
सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा:- संग्रामपूर तालुक्यात सोनाळा हा भाग संत्र्याचा पट्टा म्हणून ओळखला जातो. संत्र्याच्या बगीच्यामुळे शेती, माती आणि नाती जपणारी कंपनी अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या बुलढाणा जिल्ह्यात पहिला अत्याधुनिक व सुसज्ज संत्रा प्रक्रिया उद्योग सोनाळा येथे बोरखेड रोडवर दिनांक दहा मार्चला मोठ्या शकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. येथे तीन अत्याधुनिक मशीन लावले गेले आहे. अवघ्या दोन तासात दहा टन संत्रावर प्रक्रिया होण्याची क्षमता यामध्ये आहे. उत्पादन साठी प्रसिद्ध असल्याने या भागामध्ये एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे शेतकरी सर्व संत्रा बाहेर नागपूर अमरावती सारखे शहरात विकण्यासाठी नेत असत. ही शेतकऱ्याची परिस्थिती पाहता भूमिपुत्र अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे सीईओ सुनील शेळके व बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक व अध्यक्ष जयश्री शेळके यांनी शेतकऱ्यांसाठी हा उद्योग जिल्ह्यात प्रथमताच सोनाळा येथे सुरू केला आहे. भविष्यात सोनाळा संत्री हा जागतिक ब्रँड बनवू असे प्रतिपादन अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके यांनी केले आहे . अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील पहिला संत्रा प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ १० मार्च सकाळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजश्री शाहू परिवाराचे संस्थापक श्री भाऊसाहेब शेळके हे होते. शिवसेना (उबाठा) गटाचे सह संपर्क दत्ता पाटील, काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, प्रदेशाध्यक्ष महिला ओबीसी आघाडी ज्योतीताई ठोकणे, जि. प. सदस्य प्रमोद भाऊ खोद्रे, शिवसेना (उबाठा) गटाचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गजानन वाघ, संग्रामपुर तालुका अध्यक्ष रवींद्र झाडोकार, काँग्रेसचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, सोनाळा गावचे सरपंच हर्षलजी खंडेलवाल, प्रकाश बापू देशमुख, एम.डी. साबीर असे दिग्गज नेत्यांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली होती. प्रारंभी महानायकाच्या प्रतिमेचे पूजन करून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्र्याचा हार घालून सुनील शेळके यांचा सत्कार करणार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सोनाळा संत्री या ब्रँड चे लोकार्पण करण्यात आले. यापुढे भविष्यात या ठिकाणी संत्रा प्रक्रियेचे आणखी इतर उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. असे सीईओ सुनील शेळके यांनी सांगितले. सोनाळा परिसरात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करून अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने शेतकऱ्याच्या कल्याणाचे कार्य केल्याचे संगीतराव भोंगळ यांनी म्हटले आहे. दत्ता पाटील म्हणाले की या संत्रा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सोनाळ्याचे नाव देशभरात पोहोचणार असून सुनील शेळके व जयश्री ताई शेळके यांच्या दूरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले. स्वातीताई वाकेकर यांनी शेळके दांपत्याच्या विकासाच्या व्हिजनचे कौतुक केले. संत्रा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनाला जीवनात गोडवा येईल असा विश्वास ज्योतीताई ठोकणे यांनी व्यक्त केला आहे. सोनाळा येथे सुरू झालेल्या महत्त्वकांशी संत्रा प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवेल असा विश्वास प्रकाश अवचार पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वप्निल देशमुख तर आभार प्रदर्शन मनोज वाघ यांनी केले.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकला आनंदअभिता ॲग्रो इंडस्ट्रीज ने सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करून कार्य केल्याच्या भावना अनेक शेतकऱ्यांनी नागरिकांनी व्यक्त केल्या. दोन तासांमध्ये दहा टन संतरावर प्रक्रिया करण्याची क्षमता या अत्याधुनिक मशीन्स मध्ये आहे माफक दरात या ठिकाणी संत्रा क्लीनिंग, वॅक्सिंग व ग्रीटिंग करून मिळणार आहे वेळ व पैसा दोन्ही वाचणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.शेतकऱ्यांनी अनुभवले संत्रा परिगिरीचे प्रात्यक्षिकसंपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व मलकापूर एमआयडीसी सोडली तर फार काही उद्योग नाहीत. उद्योग कसा चालतो हे पाहण्यासाठी संधी मिळाली असल्याने रविवारी सोनाळा व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना व नागरिकांना ही संधी मिळाली आहे. संत्रा प्रक्रिया कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखवण्यात आले. सर्व शेतकरी व नागरिकांना अत्याधुनिक मशीन जोडून बघता आल्याने सर्व आनंदीत झाल्याचे स्पष्ट चित्र दिसले आहे.