मोहन चव्हाण तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि: ११ मार्च २०२४परळी येथील रेल्वे उड्डाणपुलाखालील होत असलेले प्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी लोकांकडून मागणी होत असलेल्या ट्रान्सपोर्ट रोड मंजूर होऊन महिना उलटला तरी त्याचे प्रतीक्षा काम संबंधित गुत्तेदाराकडून सुरू करण्यात आले नाही त्यामुळे रोड सुरू करण्यासाठी मुहूर्त आहे की काय तसेच रोड कधी सुरू करणार असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केला आहे. हा रोड मंजूर करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत त्याचाच भाग म्हणून एक निवेदन बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले आणि पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा उचलला त्या मागणीला यश आले परंतु रोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. लोकसभेच्या आचारसंहिता पुढील आठवड्यात केव्हाही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सरकारी कामे करता येणार नाही त्या अगोदरच रोडच्या कामाला संबंधित गुत्तेदाराला सांगून पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परळीतील शिवाजीनगर इराणी गल्ली आंबेडकर नगर थर्मल कॉलनी या भागात राहणारे लोकांना या रोडमुळे आणि वाहनामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आरोग्याचा दर्जा खालावला जात आहे. अनेक वर्षापासून या रोडचा विषय प्रलंबित होता त्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत परंतु आपण प्रयत्न करून हा रोड मंजूर करून घेतला त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला ऑफिसला चकरा माराव्या लागल्या परंतु प्रत्यक्षात गुत्ते दाराकडून कामाला सुरुवात झाली नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची न खेळता त्वरित कामाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.