शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : एक वाजता शहरी गरीब जीवनमान व त्यांना उपजीविका ची शाश्वत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी सन 2016 पासुन राज्यात सुरु झालेली आहे या अभियान अन्तर्गत बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी विविध सेवा व वस्तु एकाच छताखाली ऊपलब्ध करण्यास शहर उपजिविका केंद्र संकल्पना आकारास आली आहे. याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 4 आक्टोबर रोजी सेलु नगर पालिकेत मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधीकारी श्री देविदास जाधव साहेब व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल सचिव शेख मोहसिन,सदस्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख घुले साहेब, महिला बचत गटाचे अध्यक्ष तथा सचिव व सर्व महिला सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी शहर उपजीविका अभियान अन्तर्गत सेलू शहरातील महिलांनी या योजने अंतर्गत ज्या ज्या सुविधा देण्यात येतात या विषयी माहीती विषद केली. त्यांनी माहिती सांगताना म्हणाले की, छोट्या उद्धोंगाना सहाय्य करण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटाव्यतिरिक्त छोट्या उद्धोगांना नोंदणी करण्यात सहाय्य करणे नवीन उद्योग उभारणीस मदत करणे शासकीय योजनांचे आर्थिक व भौतिक लाभ मिळवुन देण्यासाठी प्रस्ताव तयार करून CLC द्वारे सहाय करणे शहरामध्ये एक लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहर उपजिविका पद्धत राबवु शकते.पत्रकार संघाचे सदस्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी पुढे सांगितले की, सदर योजना महीला व पुरुष लाभार्थीना मिळू शकते. अभियान अन्तर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या लाभार्थीना सेवा व वस्तु यांची पुरवठादार म्हणुन नोंदणी करण्यात येत आहे. लाभार्थीना खाजगी कंपण्यात रोजगार उपलब्ध करुन बचत गटाचे उत्पादन शहर व उपजिविका केंद्र विक्री करण्याचा उपयुक्त ठरते. शहर उपजीविका केंद्राचे प्राप्त झालेले निधी, खर्च, व वस्तु व सेवाद्वारे उत्पन्न याचा ताळमेळ घेणे आवश्यक आहे. एकुणच हा उपक्रम अभियानातील घटकाच्या उपादिष्ट सहय्याभुत ठरतो. हा उपक्रम राबवुन शहरात अभियानाची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असा मोठा संकल्प आहे. यात नगर पालिका सहायक अधीक्षक अविनाश भिसे, न प कर्मचारी व महिला बचत गटाचे पदाधिकारीसह शहरातील सर्व वार्डातील महीलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.