सय्यद जुल्फेखार अली
ग्रामीण प्रतिनिधी बीड
नेकनुर : ग्राम पंचायत मधुन नुकतेच बदलून गेलेले ग्रामसेवक बालाजी बहिरवाळ यांनी नेकनुरचे माजी ग्रा.पं सदस्य शिवाजी दगडु शिंदे यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व तुझ्या तक्रारी वरुन मी निलंबित झालो आहे गावठी पिस्तूलने गोळ्या घालून व अजुन माणसं आनुन तुला जिवे मारतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली नेकनुर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचार प्रकरणी कालच निलंबित झालेल्या ग्रामसेवक बालाजी बहिरवाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना आज दुपारी दिड ते दोन घ्या सुमारास शासकीय दुध डेअरी बीड बार्शी रोडवर घडली आहे.नेकनुर येथील माजी ग्रा.पं सदस्य शिवाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक बालाजी बहिरवाळ याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार केली होती या मध्ये त्याची चौकशी होऊन साडेतीन लाखांचा भ्रष्टाचार सिध्द झाला म्हणून या प्रकरणी कालच निलंबित करण्यात आलं आहे.याचा राग मनात धरून त्यांनी आज दुपारी शिवाजी शिंदे हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.२३ ए.एच.९३४४ वरुन बीड वरुन नेकनुर कडे येत अस्ताना पाठीमागून आपल्या चारचाकी गाडी क्रमांक एम एच.१२ . ९६७९ मध्ये येणाऱ्या ग्रामसेवक बालाजी बहिरवाळ यांनी शिवीगाळ करत गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला शिवाजी शिंदे हे सतर्क असल्याने त्यांनी गाडी वरून खाली उडी मारल्याने काही अनर्थ घडला नाही.ईतका होऊन पुन्हा अजुन माणसं आनुन तुला गावठी पिस्तूलने गोळ्या घालून ठार मारतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली या वेळी मोठीं गर्दी जमली होती या प्रकरणी शिवाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलिस ठाण्यात बालाजी नारायण बहिरवाळ रा.मंझरी ता.बीड याच्या विरुद्ध कलम ३०७, ४२७ ,५०४,५०६,३४ भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून बालाजी बहिरवाळ फरार आहे.पेठ बीड पोलिस अधीक तपास करीत आहेत.


