भागवत नांदणे
सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबाद रिंगणवाडी येथे बस सेवा सुरू नसल्याने अनेक वर्षांपासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना खूप मोठा आर्थिक भार व त्रास सहन करावा लागत होता यात शालेय विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युवा जिल्हा अध्यक्ष मारोती बोरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तहसील कार्यालय तसेच जळगाव आगार गाठून निषाद पार्टी च्या वतीने निवेदनाद्वारे पाठपुरावा केला असता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन एसटी महामंडळाने निरिक्षण प्रक्रिया पूर्ण केली आहे . सविस्तर महिती अशी की दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी निषाद पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय संग्रामपूर व एसटी महामंडळ आगार जळगाव जामोद येथे निषाद पार्टी च्या वतीने निवेदन दिले होते. निवेदन देऊन दोन महिने उलटून गेले असता सुद्धा काहीही कार्यवाही दिसत नव्हती म्हणून निषाद पार्टीचे बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष मारुती बोरवार व निषाद पार्टी चे कार्यकर्ते यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी बुलढाणा विभाग गाठला आणि तिथे कार्य करीत असलेले श्री हरीश नागरे साहेबांना गावकऱ्यांची तसेच विद्यार्थ्यांची समस्या सांगितली, त्यांनी तुरंत निर्णय घेऊन बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले, आणि दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानिक रोड निरिक्षणासाठी निरिक्षण वाहन पाठवले व लवकरात लवकर बस सेवा सुरू होणार असे आगार अधिकारी हरीश नागरे यांनी सांगितले. या वेळी आगार अधिकारी टाले साहेब, युवा अध्यक्ष मारोती बोरवार, विदर्भ अध्यक्ष रमेश नांदणे गुलाबराव नांदणे, शाखा अध्यक्ष विष्णू नांदणे, शिवाजी बोरवार, मोहन भानगे,नंदु बोरवार, अशोक आमझरे, सोपान नांदणे, सुनिल नांदणे, तसेच सर्व गावकरी व निषाद पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.


