बद्रिनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली दि 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.