बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीसाठी हिंगोली शहरातील मिश्चित करण्यात आलेले मतदान केंद्राची प्राथमिक पाहणी केली. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हिंगोली नवनाथ वगवाड मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी अरविंद मुंढे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे तसेच तहसिल व नगरपरिषदेचे इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पाहणी व निश्चित केलेल्या मतदान कॅद्रामध्ये मतदानाच्या दिवशी म्हणजे 26 एप्रिल 2024 रोजी यतदारांना उपलब्ध करून देण्याच्या सोयी सुविधा बाबत आवश्यक त्या सुचना केल्या तसेच या सोयी सुविधांची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे निर्देशही यावेळी चेत्रणेला दिले.


