अजिंक्य मेडशीकर तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव ता 21 – श्री गुणवंत महाराज संस्थान भेरा दरबारवर आज ता 21 रोजी दुपारी 2.30 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आलेया महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत गुणवंत महाराज अमरगाथेची सांगता झाली.या सप्ताहास 14 मार्च रोजी सुरुवात झाली श्री गुणवंत महाराज अमर गाथेचे वाचन ह भ प भगवान महाराज काळे करीत आहेत या सप्ताहात सकाळी 5.00 ते 6.00 वाजताच्या दरम्यान काकडा भजन, सकाळी 7.00 ते 8.00 वाजताच्या दरम्यान विष्णू सहस्त्रनाम ,सकाळी 9.00ते 11.30 व दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 वाजताच्या दरम्यान ग्रंथ पारायण सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजताच्या दरम्यान हरिपाठ, रात्री8.00ते 10.00 वाजताच्या दरम्यान हरिकीर्तन पार पडले.14 मार्च रोजी प पू गुणवंत महाराजांच्या पालखीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली या सप्ताहात मृदंगाचार्य म्हणून संगीत विशारद गजेंद्र महाराज कावरखे व त्यांचे विद्यार्थी कार्य करीत आहेत कथासंगत श्रीराम बुवा घाडगे व काशीराम महाराज हंबीर हे करीत आहेत.गायनाचार्य म्हणून ह भ प अंकुश महाराज सेवा दिली या सप्ताह मध्ये कालिकामाता संच फेरा यांनी गोंधळाचा कार्यक्रम सादर केला 15 मार्च रोजी ह भ प पंकज महाराज सरनाईक यांचे कीर्तन तर 16 मार्च रोजी गजानन देविदास धोंगडे यांचा गोंधळाचा कार्यक्रम झाला 17 मार्च रोजी ह भ प नारायण महाराज जाधव व 18 मार्च रोजी ह भ प अमोल महाराज जाधव यांचे कीर्तन पार पडले 19 मार्च रोजी ह भ प विजय महाराज सुळे यांची कीर्तन झाले 20 मार्च रोजी ह भ प गजेंद्र महाराज कावरखे यांचे कीर्तन पार पडले 21 मार्च रोजी ह भ प भगवान महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरनास सुरुवात झाली 11हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प पू पवन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पवन महाराज मित्र मंडळ भेरा दरबारचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले श्री चे सेवाधारी ग्रुप शिरपूर च्या 300 महिलांनी रवी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा दिली . फोटो ओळी -महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला