परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये संपूर्ण केळापूर तालुक्यातील गोरगरीब जनता आपल उचार करण्यासाठी येत असते. त्याच बरोबर अनेक वेळा अनोळखी प्रवासी सुद्धा रुग्णालयात येतात. म्हणून प्रवेश द्वारावरील रुग्णालयाचे बोर्ड नवीन लावल्यास अनोळखी लोकांना रात्री सुद्धा रुग्णालय शोधण्यास सोपे जाईल. त्याच बरोबर रुग्णालयाच्या प्रवेश द्वारापासून ते रुग्णालयापर्यंतचा डांबरी रोड हा खड्डेमय झाला आहे .त्यामुळे संबंधित विभागाने रोड ची काळजी घेऊन डांबरी रोड मधील खड्डे बुजवावे. त्याच बरोबर प्रवेश द्वारावरील रुग्णालयाच्या नावाचे बोर्ड व त्यात व्यवस्तीत लाईट चा प्रकाश देण्यात यावा अशी स्थानिक नागरिक मागणी करीत आहे .