अशोक कराड ग्रामीण प्रतिनिधी करंजी
करंजी: पाथर्डी तालुक्यात वाढती गुन्हेगारी व गुंडगिरीला आळा बसण्यासाठी उद्या दिनांक गुरुवार 21 रोजी पाथर्डी बंदची हाक दिलेली आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये वाढत्या गुंडगिरीला खतपाणी घातल्या जाते त्यामुळे तालुक्यामधील चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कोणत्यातरी गावांमध्ये शेळ्या चोरून नेऊन तसेच घरपोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. या तालुक्यामध्ये गुन्हेगारी बरोबरच गुंडगिरी शुद्ध या तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या जागा बळकविणे तसेच या तालुक्यांमध्ये मटका जुगार मोठ्या प्रमाणात सर्रास उघडपणे चालू आहे. पाथर्डी शहरामध्ये ब्लॅकमेल केले जाते. व्यापारी पेठेपदी सोनारांना दमदाटी करून व अनेक ठिकाणच्या जागा बळकविणेअशा प्रकारची उघडपणे गुन्हेगारी व गुंडगिरी यांना खतपाणी घातल्या जाते. यामागे बऱ्याच लोकांचं या लोकांना हितचिंतक आहे. बाजारपेठेतील सोनार गल्लीतील सोनारांना फसविणे अशा प्रकारची मोठी गुन्हेगारी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. याच गुंडगिरीला किंवा गुन्हेगाराला आळा बसण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 21 मार्च 2024 पाथर्डी बंदची हाक दिली दिली आहे.या पाथर्डी तालुक्यातील जनतेला आव्हान करण्यात येत आहे. उद्या संपूर्ण पाथर्डी तालुका बंद आहे. असे आव्हान करण्यात येत आहे. संपूर्ण पाथर्डी तालुका उद्या बंद बंद