गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव : व्हॉट्सअँप स्टेटस मोबाईलवर ठेवण्याचे कारणावरून थापड-बुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील २ आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. फिर्यादी निलेश गणेशराव पोहरे रा. पिंपरी महिपाल ता.जि. नांदेड यांनी फिर्याद दिली होती की, दिनांक १/२/२०२४ रोजी ८.०० वाजताच्या सुमारास घरी असताना मोबाईलवर महापुरुषांचे स्टेटस ठेवले होते, त्यावरून व्हाट्सअपवर झालेल्या संभाषनानंतर आरोपी क्र. १ यांनी फिर्यादीस सायंकाळी ६.३० वाजताचे सुमारास शाळेकडील जिमकडे बोलावून शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे गावातील ईतर ११ जणांनी महापुरुषांचे स्टेटस मोबाईलवर ठेवण्याचे कारणावरून थापडबुक्क्यानी मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.सदर फिर्यादीवरून पोलीस ठाणे लिंबगाव येथे एकूण १२ आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १४३,१४९,३२३,५०४,५०६ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३(१)(R),३(१)(S) अन्वये गुन्हा क्र.१५/२०२४ नोंदविण्यात आला. त्यानंतर यातील दोन आरोपींनी ॲड. अविनाश वि. कोंडामंगल व ॲड. नागेश बी. कदम यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज क्र. ९३/२०२४ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे दाखल केला होता. सदरील अर्जाची अंतिम सुनावणी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. ई. बांगर यांच्या न्यायालयासमोर होऊन आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. अविनाश वि. कोंडामंगल व ॲड. नागेश बी. कदम यांनी बाजू मांडली तर सरकारी वकील ॲड. कोकाटे मॅडम यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले.


