स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
आज दि.२०/०५/२०२४रोजी उमरखेड ब्राह्मण समाजातर्फे बीड जिल्ह्यातील पिंपरगव्हाण गावातील राऊत मारे यांच्या कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध व कडक कारवाई करणे बाबत मा. उपविभागीय उमरखेड यांना निवेदन देण्यात आले.नुकतीच महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक पार पडली असून चौथ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानामध्ये पिंपरगव्हाण ता जिल्हा बीड येथील राऊत मारे कुटुंबाने तुतारी या निवडणूक निशाणी समोर बटन दाबून मतदान न केल्यामुळे राऊतमारे कुटुंबावर जीवघेणा हमला करण्यात आला पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीने तंत्राचा वापर करून मना विरुद्ध मतदान केल्यामुळे झालेली मारहाण व जीवघेणा हमला सदर घटनेचा उमरखेड तालुक्यामध्ये ब्राह्मण समाज व महिला तर्फे निषेध नोंदविण्यात आला.