सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा:- संग्रामपूर तालुक्यात सोनाळा शिवारात २० मे रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. संपूर्ण संग्रामपुर तालुक्यात सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी संकटांनी जनजीवन विस्कळीत झाले, तर शेती पिकाची सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सोनाळा ते बावनबीर एकदम शॉर्टकट असलेला रोड वर मोठमोठे झाडे पडले असल्याने वाहतूक ची कोंडी झाली होती. सोनाळा ते बावनबिर या रोडने कामगार लोकांचा सकाळी आणि संध्याकाळी ये जा जास्त असतो. आचारसंहिता लागण्या अगोदरच या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्याची भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता. व कामही जलद गतीने सुरू झाले. पण रोडच्या बाजूने साईट खड्डे खोदून ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यात या अवकाळी पावसाने व वाऱ्याने या रोडवर मोठमोठे झाडे कोसळली होती. साधारणत: सायंकाळी ०५:३० च्या सुमारास या पडलेली झाडाने वाहतूक बंद झाली होती. ही दृश्य पाहून एक जेसीबी ऑपरेटर नवयुवक वैभव गजानन भगत यांनी जेसीबी च्या सहाय्याने पडलेले झाडे रस्त्याच्या बाजूला केली, व वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू केली. यात ओम सोनाजी घोगरे व पवन राजू मोरे यांनी जेसीबी ऑपरेटर ला चांगल्या प्रकारे मोलाचे सहकार्य केले.