विशाल कालापाड
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : मालेगाव येथून जवळच असलेल्या उडी येथे शिवराज गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. तर या आरोग्य सेवेमध्ये सर्दी, ताप, खोकला, बी.पी, शुगर, दमा, गुडघेदुखी, या सह इतरही आजाराबद्दल सेवा देण्यात आली आहे.या आरोग्य शिबिराला मालेगाचे डॉ प्रदिप गजानन भेंडेकर( BAMS जनरल फिजिशन, यांनी आपली मोफत सेवा दिली तर ) माऊली हॉस्पिटल व नाथांजली मेडिकल मालेगावचे अश्विन भेंडेकर,शुभम तडसे, वैभव वायचाळ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या आरोग्य शिबिराचे आयोजन शिवराज गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते हर्षद घुगे, किशोर घुगे, महेश बांगर ,श्रीकांत घुगे अनिकेत घुगे, विनोद सानप, तसेच गावचे सरपंच रंजीत घुगे, तसेच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन घुगे व यावेळी उपस्थित असलेले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अशांत कोकाटे, पंचायत समिती वाशिम केकतउमरा ग्रामपंचायत जलसेवक प्रदीप पट्टेबहादुर,युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय नवघरे व गावातील इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे आरोग्य शिबीर उत्साहामध्ये संपन्न झाले.











