स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे सेंट पॉल्स अकॅडमीतील मुख्याध्यापकांचा व शिक्षकांचा सत्कार
जितेंद्र लखोटिया
ग्रामीण प्रतिनिधी,तेल्हारा
(तेल्हारा) हिवरखेड : येथील बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हिवरखेड शाखेचे मॅनेजर श्री राहुलजी बाभुळकर व रवींद्र चव्हाण यांनी शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे येऊन सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले व आपण सगळे लोक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून देशाच्या भविष्याला आकार देण्याचं पवित्र कार्य आपण सर्व शिक्षक लोक श्री चंद्रकांत तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहात म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर राहुल बाभुळकर यांनी श्री. चंद्रकांत तिवारी यांचा विशेष सत्कार करून सर्व शिक्षकांचा सत्कार केला व शिक्षकां ची हितगुज केली आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिनी मार्गदर्शन केले.











