पातुर नंदापूर,सोनखास परिसरामध्ये लंम्पी रोगाची जनावराला लागण लसीकरण नाही
विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पातुर नंदापूर परिसरामध्ये जनावरावर लंम्पि रोगाचा प्रादुर्भाव येण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांना ताप येणे,
जनावर गाठीचे प्रमाण दिसणे,या रोगाचे मूळ कारण आहे. शेतकऱ्याने आपल्या कोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे ही प्रतिबंधक असल्यामुळे व घाणीमुळे हा रोग जनावराला निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा रोग संसर्गजन्य असून एका जनावरा पासून दुसऱ्या जनावराला होऊ शकतो पातुर नंदापूर परिसरामध्ये. पातुर नंदापूर ,सोनखास, बोरगाव खुर्द. या परिसरामध्ये जनावरावर प्रादुर्भाव दिसून येत आहे परंतु अजून पर्यंत पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्रतिबंधक लस मिळत नसल्यामुळे शेतकरी रोष व्यक्त करत आहे. असे कित्येक जनावरे यांच्यावर गाठीचे परिणाम दिसून येत आहेत परंतु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये अजून पर्यंत प्रतिबंधक लस शेतकऱ्यापर्यंत जनावरांना देण्यासाठी मिळाली नाही. पातुर नंदापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त गावे असल्याकारणाने फक्त दोन दिवस पातुर नंदापूर साठी असल्याकारणाने शेतकऱ्यासमोर आपल्या जनावरावर उपचार करण्यासाठी प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी आपले जनावरे सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेत असतात परंतु दवाखाना बंद असल्यामुळे डॉक्टर फक्त दोन दिवस असल्यामुळे शेतकऱ्याला खाजगी डॉक्टर बोलावून आर्थिक फटका बसत आहे. पशुवैद्यकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दखल घेऊन फक्त नंदापूर येथे वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे व बाधित झालेल्या जनावरांसाठी प्रतिबंध लस उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा शेतकऱ्याची मागणी आहे.