कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : भारतीय आयुर्विमा महामंडळाने एलआयसी विमा पॉलिसी वरील बोनस दर वाढवावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी करावे, जी.एस.टी कमी करावी, एजंटांना पेन्शन लागू करावी,एजंटचा ग्रुप टर्म इन्शुरन्स वाढवावा, आधी विविध मागण्यासाठी एलआयसी एजंट असोसिएशनच्या वतीने एलआयसीच्या वर्धापन दिनापासून देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतात दिनांक.5 सप्टेंबर ला एजेटांनी विश्राम दिवस पाळला. आकोट शाखेच्या वीमा प्रतिनिधींनी या आंदोलनाला प्रतिसाद देत शाखेसमोर नारेबाजी करून विश्राम दिवस पाळला . या आंदोलनात विमा प्रतिनिधीनी चांगला प्रतिसाद दिला मागण्या मान्य होईपर्यंत हे असहकार आंदोलन सुरूच राहणार असण्याचे संघटनेने म्हटले आहे.
या विश्राम दिवस असहकार आंदोलनात एलआयसी एजंट असोसिएशन अकोट चे अध्यक्ष कमलकिशोर भगत,सचिव विनोद भुतडा, विभागीय सदस्य ज्ञानेश्वर धामणे, कोषाध्यक्ष संजय खंडेराव,संजय गुजर,विजय जाधवाणी,ज्ञानेश्वर आखरे, चंद्रशेखर तायडे, दिलीप गायकवाड, रवींद्र नाथे,मिलिंद हाडोळे,विजय जुनगरे,फकीरचंद भट्टड,रमेश वनकर,शिरीष वंजारा,वासुदेवराव सिरस्कार, विपुल सिरस्कार ,गणेश दुतोंडे, प्रफुल वाकोडे,प्रदीप कराळे,शिवनाथ साळुंखे, संतोष विनके, गोपाल कोरडे, रियासतअली देशमुख, विनोद हेंद, प्रदीप बाळापुरे,ज्ञानेश्वर आखरे, विनोद बहादुरे, ढोले महाराज, आदिसह मोठ्या संख्येने विमा प्रतिनिधी हजर होते.











