शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी : दि. 19 ऑक्टो परभणी जिल्हायात मराठा आरक्षणाचा लढा अतिशय तीव्र होत आहे.अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या अति महाविराट सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सकल मराठा समजातील अनेक खेड्यापाड्यात कुठल्याच राजकीय पक्ष्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कोणीही उपस्थित राहणार नाही आणि कुठल्याच राजकीय पक्ष्याच्या पुढऱ्याला गावात प्रवेश करू द्यायचा नाही असा ठाम निर्णय घेतला आहे. प्रत्येक खेड्यामध्ये आज जागोजागी सर्व राजकीय पुढ्याऱ्यांना गाव प्रवेश बंदी असे मोठ मोठे बॅनर प्रत्येक गावाच्या पाटीवर लावून आमच्या गावात येऊन उगाच आपला स्वतःचा अपमान करून घेऊ नये अशी तंबी पण दिली आहे.जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत या ठोक भूमिकेमुळे सर्व राजकीय पुढ्याऱ्या मध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. अनेक गावामध्ये, शहरामध्ये आमदारांचे नियोजित कार्यक्रम हाणून पाडण्यात आले असल्याचे दिसून आले आहेत.


