हनुमान बर्वे
शहर प्रतिनिधी वाशिम
हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षामधील कार्यकर्ते पदाधिकारी व तसेच सहकारी यांच्या एकजुटीने बैठक आयोजित केली होती. यामध्ये पक्षाचे मत व कार्यकर्त्यांची उत्सुकता व सर्वांचे विचार ऐकून घेऊन. पक्षाचे विचार कार्यकर्त्यांसमोर ठेवून पदाधिकाऱ्यांसमोर आपले मत मांडून हिंगोली जिल्हा हा लोकसभेसाठी महत्त्वाचा असून यामध्ये नांदेड व हिंगोली जिल्हा महत्त्वाचा आहे. मोदी लाटेमध्ये सुद्धा दोन्ही जिल्ह्यांनी काँग्रेसचे खासदार निवडून आणले होते. व परत काँग्रेसचे वर्चस्व राहण्यासाठी परत एका जुटीने नव्याने व जोमाने कामाला लागावे. म्हणून मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आढावा बैठक ठेवण्यात आली होती. पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी व सर्वांच्या एक मताने एक जोशाने निवडणूक लढवू असे हुंकार मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व मा.आ. भाऊराव पाटील गोरेगावकर व आ.प्रज्ञाताई सातव व ईतर पक्ष पदाधिकारी यांच्या समक्ष सर्वांनी कामाला लागावे असे आव्हान अशोकराव चव्हाण यांनी केले. व तसेच त्यांनी भाषणा दरम्यान विरोधी पक्षाची कान उघडणी केली. पेट्रोल दरवाढ. घरगुती गॅस वाढ.शेती माला ला हमी भाव. व महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार देण्याच्या श्वासन दिले होते पण सद्यस्थिती सरकारने अधिकही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले नाही असे आपल्या भाषणामध्ये सांगण्यात आले व कार्यक्रम पार पडला.


