अजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : येथील विनोद शिवाजी गोपेवाड यांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेबद्दल शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. कुणी म्हणत आहे की तो झाडावरील मऊळ झाडण्यास गेला असता त्याला करंट लागला, तर कोणी म्हणत आहे सोईट रोडवर वॉटर फिल्टर येथे पाण्याचे टँकर तो व्यक्ती घेऊन गेले असता त्याला तिथे पाणी भरताना करंट लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याची पीएम करून, रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चौकट सदर प्रकरणात अजूनही कोणत्याही नातेवाईकाचा रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त झाला नसून, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर यांच्या मेमो नुसार चौकशीला आम्ही सुरुवात केलेली आहे. सदर इसमाचा ट्रॅक्टर वर कुठेतरी करंट लागून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएम करून बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिलेली आहे. आणि पुढील तपास सुरू आहे