सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : दि. 21 दोन राजांमध्ये संघर्ष उफाळला. कारण होत, महामार्ग लगत असलेली, 16 एकर सातारा बाजार समितीची जागा. या जागेवर आ. शिवेंद्रसिंह राजे यांनी बाजार समितीसाठी नवीन इमारतीचे नियोजन केले आहे. इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी, खा. उदयनराजे व त्यांचे कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी येऊन, त्या ठिकाणी असलेले पत्र्याचे शेड, मंडप पाडून खा. उदयनराजे व काही वहिवाटदार यांच्या मालकीची ही जमीन असल्याचा दावा करत, भूमिपूजनाला विरोध केला. मात्र आ. शिवेंद्रसिंह राजे यांनी आम्हाला शासनाने बाजार समितीसाठी ही जागा उपलब्ध करून दिली आहे. तसे आमच्याकडे हायकोर्टचे आदेश आहेत. खासदार साहेबांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे त्यांनी पोलीस यंत्रणे कडे सादर करावेत, असे सांगितले व त्यांनी त्याचवेळी खासदारांसमोर भूमिपूजनाचा नारळ फोडला. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला खा. उदयनराजे यांनी जलजीवन योजना, ग्रामीण रुग्णालय, आणि क्रीडांगणाच्या कामासाठी दुसरा नारळ फोडला. यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते. दोन बाजूच्या समर्थकांनी आमदार खासदारांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी चालू केली होती, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संघर्षाचा बाका प्रसंग उद्भवत असताना तो टाळला, आता मात्र सातारच्या जनतेला त्या जागेवर बाजार समितीची नवीन इमारत पाहिला मिळणार ? का त्या जागेवर आणखी काही उभे राहणार? आज दिवसभर हाच चर्चेचा विषय ठरला, कारण दोन्ही राजांनी नारळ फोडून, टिकाव तर मारलाच.