सुधीर जाधव.
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : अंगापूर येथे झालेल्या स्व. खाशाबा जाधव तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे बुद्रुकचे विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. इ. २री मधील विद्यार्थी वीर महेश जाधव याने २२किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. ऋषी संदीप पवार याने २२किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला. २८ किलो वजनी गटात शिवम जाधव याने तृतीय क्रमांक मिळवला. सोहम शंकर जाधव याने २८किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला. वीर महेश जाधव याची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री अविनाश साबळे, श्रीम. सुर्वे, सौ. खाडे मॅडम व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक पै.आदित्य माने यांचे अध्यक्ष सतिष जाधव, महेश जाधव, सचिन देशमुख व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अंबवडे बुद्रुक, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.