सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : काळोशी येथे विजय निकम यांनी, मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भूमिपुत्र भारतीय जवानांच्या सन्मानार्थ, गावातील माजी सैनिकांच्या जीवनावर आधारित त्यांच्या पराक्रम, शौर्य याच संकलन करून, स्वराज्य फिल्मच्या माध्यमातून शौर्य या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. संपूर्ण देशात शासनाच्या परिपत्रका प्रमाणे प्रत्येक गावात शहीद जवानांच्या सन्मानार्थ कोनसीला अनावरण करून आजी-माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. परंतु काळोशी गावाने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत, संपूर्ण देशात वेगळेपण निर्माण करून एक प्रकारे जवानांना अनोखी आदरांजली वाहिली. शौर्यम चे निर्माते विजय निकम यांनी जिल्हा परिषद शाळा काळोशी येथे 15 ऑगस्ट चा योग साधून वेब सिरीजचे पोस्टर लॉन्च केले, तरी जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या वेब सिरीजचे भाग संपूर्ण महाराष्ट्रत कणार आहे. असे त्यांनी सांगितले.


