रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग नवी दिल्ली व आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अकोट व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोट यांच्या वतीने एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन बचत भवन, पंचायत समिती, अकोट येथे शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी १०:०० करण्यात आले आहे. PMFME योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गट, महिला बचत गट, सहकारी संस्था, वैयक्तिक शेतकरी तसेच भूमिहीन व्यक्ती यांना खाद्य प्रक्रिया उद्योग उभार ण्याकरिता ३५ टक्के अनु दान देय आहे, तसेच AIF अंतर्गत बाजार संपर्क वाढवुण निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी माल काढणी पश्चात सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने रु.२ कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व बँक कर्जावर वार्षिक ३ टक्के व्याज सवलत असुन, ही सवलत जास्ती त जास्त ७ वर्षासाठी उपलब्ध असेल. तरी कृषि खाद्य उद्योग उभारण्यास इच्छुक व सदर योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने तालुक्या तील जास्तीत जास्त होत करू शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यां चे सदस्य, शेतकरी उत्पादक गटांचे सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य, सहकारी संस्थेचे सदस्य, भूमिहीन व्यक्ती आदींनी सदर कार्यशाळेत नियोजित वेळेवर उपस्थित राहवे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अकोट सुशांत शिंदे यांनी केले आहे.