सुधीर जाधव,
जिल्हा प्रतिनिधी सातारा.
सातारा: भोंदवडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबवडे खुर्द-भोंदवडे येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, शासनाच्या निर्देशानुसार दोन्ही गावातील शहीद जवान, वीर माता-पिता, वीर पत्नी, आजी-माजी सैनिकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यानंतर कर्तव्य पथ सैनिक संघटना, सातारा. यांच्या वतीने कॅप्टन अशोक गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शालेय उपयोगी साहित्य देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सातारा सैनिक स्कूलचे गजानन गंगावणे सर यांनी शाळेला दोन स्मार्ट टीव्ही भेट दिले. सीमेवर देश सेवा करणारे माजी सैनिक ज्ञान वृद्धीसाठी समाजसेवा करण्यास विसरले नाहीत, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्याच बरोबर निवृत्त शिक्षक जे. के. कणसे यांनी शाळेला शेगडी भेट दिली. या देणगीदारांच्या प्रति आदर भावना व्यक्त करून, शिक्षिका कदम यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, त्याच बरोबर सरपंच रुपेश पवार, उपसरपंच राजेश गुजर, सुधीर निकम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब गुजर, ग्रामसेवक अश्विनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य, विविध मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच विजय गुजर यांनी केले.


