मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव पाथर्डी मतदारसंघांचे मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्ताने पैलवान युवराज पंडितकाका भोसले यांनी शेवगाव याठिकाणी भव्य शेवगाव केसरी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते या कुस्ती मैदानाचं उद्घाटन समारंभ मा. आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडला तसेच या सर्व विजेत्या पैलवानांना मा. आमदार डॉ.नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या हस्ते गौरवण्यात आले.महाराष्ट्रातील आणि भारतातील नामवंत 130 पैलवानांचा या शेवगाव मैदान स्पर्धेमध्ये सहभाग,ना भूतो न भविष्य असे दिमाखदार, डोळे दिपवून टाकणारे नियोजन या स्पर्धेत करण्यात आले अतिशय रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेच्या यंदाची फायनल देखील उत्कंठावर्धक ठरली.शेवगाव केसरी कुस्ती मैदानाची पहिली कुस्ती 3लाख 11 हजार रूपये आणि गदाच्या मनाकरी विजेता पैलवान माऊली जमधडे ठरला , तसेच सोनु कुमार यांनी दुसरा क्रमांक यांनी पटकवला तसेच द्वितीय क्रमांक ची 2लाख 11 हजार रुपायांची कुस्ती पैलवान विलास डोईफोडे यांनी पटकला द्वितीय क्रमांक पैलवान मनिष दहीया आणि तृतीय क्रमांकची कुस्ती 1लाख 11 हजार रुपायांची कुस्ती पैलवान योगेश पवार यांनी प्रथम क्रमांक पटकवला व द्वितीय क्रमांक पैलवान बंटी सिंग यांनी पटकवला तसेच हा शेवगाव केसरी कुस्ती मैदान हा किताब सर्व विजेत्या पैलवानांना शेवगाव पाथर्डी चे भाग्यविधाते मा.आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या हस्ते चांदीची गदा आणि रोख रक्कम आणि ट्राफी देवुन गौरविण्यात आले.इंटरनेटच्या मायाजालात न अडकता तरुणांनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे.–मा.आमदार डॉ.नरेंद्रजी घुले पाटील.जिल्ह्याने अनेक नामवंत खेळाडू घडविलेले आहे. क्रिडा क्षेत्रात सातत्य, जिद्द व मेहनत या त्री सुत्राचा अवलंब केला तर निश्चितच यश मिळते. क्रिडा क्षेत्राची आवड असणाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे जेणे करून आपले खेळात सातत्य राहण्यास मदत मिळते व सकारात्मकता वाढते. तरुणांनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे आपण आपल्या ध्येयाच्या जवळ क्रिडा क्षेत्र हे मन, मेंदू आणि मनगट सदृढ ठेवण्यास मदत करते. स्पर्धांच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते. आपल्या आवडत्या खेळाविषयी लहानपणापासूनच आवड व अंगी जिज्ञासा असली पाहिजे. पालकांनी सुद्धा पाल्याच्या आवडत्या क्षेत्रात करियर करून दिले पाहिजे. त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. इंटरनेटच्या मायाजालात न अडकता मैदानावर या तरच शरीर चांगले ठेऊ शकू असेही मत मा.आमदार डॉ.नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांनी व्यक्त केले.ही स्पर्धा मागील तीन वर्षापासून चालू असून ग्रामीण भागातील तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धेत त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या माध्यमातून झालेली आहे या कुस्ती स्पर्धेतून शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र पैलवान युवराज पंडितराव भोसले याचे ध्येय की प्रत्येक प्रत्येक घरामध्ये एक सशक्त व निर्विष्णु तरुण झाला पाहिजे आणि तालुक्याचे नाव देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले पाहिजे.या संपुर्ण स्पर्धाच आयोजन पंडितकाका भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पैलवान युवराज भोसले,अभिजीत भोसले आणि पृथ्वीराज भोसले यांनी संपूर्ण संपूर्ण स्पर्धेचे नियोजन केले आहे.काल संपन्न झालेल्या या स्पर्धेला अनपेक्षित अशी गर्दी लोटली होती. 10000पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेत प्रत्यक्ष अस्वाद घेतला, विशेष म्हणजे शेवगाव तालुक्यातील तरुण वर्ग आणि जेष्ठ नागरिक आणि कुस्तीप्रेमी संख्या लक्षणीय होती.यावेळी जेष्ठ संचालक काकासाहेबजी नरवडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय कोळगे, संजयजी फडके ,पंडितकाका भोसले,एकनाथजी कसाळ, अबांदासजी कळमकर, राजेंद्र दौंड, नाना पाटील मडके, अजिंक्य लांडे,कैलासराव नेमाणे, गणेशजी खंबरे,तालुका क्रीडा अधिकारी गरजे साहेब, ह भ प गणेश महाराज डोंगरे, अरुणजी घाडगे,कैलासराव नेमाणे,भाऊराव भोगंळे,रामनाथ राजापुरे,नंदुभाऊ मुंढे,कमलेश लांडगे,अमोलदादा कराड,निलेशजी कुंभकर्ण,रोहन फडके,बाळासाहेब धस,संतोष पावसे,रोहन साबळे,रोहीत वाणी,शेखर बामदळे,अर्जुन दराडे,दिपकराव चोपडे,मिलिंद पाटील,रहीत पाटील,तुषार आव्हाड, कौशक ढवळे,दिपकराव कुसळकर, शुभम जाधव आणि मोठ्या संख्येन माजी सैनिक यासह अन्य पदाधिकारी आणि कुस्तीप्रेमी उपस्थित होते.हि स्पर्धा जेष्ट संचालक पंडितराव भोसले, पैलवान युवराज पंडितराव भोसले , बॉल्डीबिल्डर अभिजीत पंडितराव भोसले,आणि पृथ्वीराज भोसले यांनी पार पडली.