लक्ष्मीकांत राऊत
शहर प्रतिनिधी,परतूर
परतूर – तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून भुरभुर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यां च्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.तब्बल तेवीस दिवसानंतर कशी का होईना पावसाने हजेरी लावल्याने समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
शुक्रवारी दुपारपासून तालुक्यात भुरभुर पाऊस सुरू आहे,या पावसाने पिकांना म्हणावा तसा आधार मिळणार नसला तरी २३ दिवसांच्या उघडीप नंतर सुरू झालेला हा पाऊस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावणारा आहे.हवामान विभागाने पुढच्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता जालना जिल्ह्यात व्यक्त केल्याने या भुरभुर पावसाने ही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागलेला आहे.तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३३ % चं २१४.८० मिमी पाऊस पडला आहे.तालुक्याची सरासरी ६५०.८० मिमी आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत ५३४.६० मिमी पाऊस पडला होता.आता पुढच्या काही दिवसात जोरदार पाऊस पडावा यासाठी शेतकरी वरुण राजाकडे डोळे लाऊन पाहत आहे.


