रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : श्री. गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे दमानी नेत्र रुग्णालय अकोला, इनर व्हील ग्रुप, अकोला आणी संवेदना ग्रुप अकोलायांच्या सौजन्याने भव्य नेत्र मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आज दि.१८ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आशाजी मालीवाल, पी. डी. सी. इनरव्हील क्लब अकोला, तर उद्घाटक शामराव आपोतीकर, अकोला हे होते.कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सभापती जी शुक्ल, व्यवस्थापक दमानी नेत्र रुग्णालय, इनरव्हील क्लब ऑफ अकोला अध्यक्ष संगीता जी गांगुर्डे, पी. पी. लतीका खडसे पी. पी. मा.शहनाज मॅडम, तस्नीम वाघ इनर व्हील क्लब ऑफअकोला, विहीर संस्थान अकोलखेड चे अध्यक्ष इंगळे, तुळशी रामजी इस्तापे बोर्डी,गौरी
पडगीलवार, निशा सुरेखा, रिटा खडसे,जयासरदेसाई, वैषाली धारीवाल, सिमा साबळे, सुजाता साबळे, यांची उपस्थिती होती .तर प्रमुख अतिथी म्हणून , दिनेश देशमुख बोर्डी, श्रीकांत पडगीलवार अकोला , बाबासेठ सेजपाल यांची उपस्थिती होती. सकाळी १० ते ३ पर्यंत ३०० रुग्णांची डॉ. दत्ता पवार यांचेकडून नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या रुग्णांची तपा सणी करून, २३४ रुग्णास मोतीबिंदू आहे. त्यांना एक निश्चित तारीख देवुनदमानी नेत्र रुग्णालय, म्हैसांग रोड, अकोला येथे त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमाचे संचालन संस्थानचे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले. सर्व अतिथींचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे विलास बहादुरे अध्यक्ष, गणेश उपाध्यक्ष, शरद सोनटक्के सचिव, विजय ढोरे कोषाध्यक्ष, महेश गाढे व्यवस्थापक, ज्वारसिंग आसोले विश्वस्त, गणेश कळसकर विश्वस्ता हे उपस्थित होते.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी, दमानी नेत्र रुग्णालय अकोला चे अजय देशमुख, राजेश मुदलीयार, श्रीकृष्ण निमकर्डे, तसेच नरेश ठाकरे, अरुण थारकर , अशोक बेलसरे, वैभव कुबेटकर, प्रशांत आकोते, शुभम हाडोळे, जनार्दन खलोकार,अनंत वानखडे, निलेश देवगीरे, ज्ञानेश्वर येवतकार तसेच पुरुष व महीला सेवाधारी यांनी परिश्रम केले.


