सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि १८ ऑगस्ट २०२३ आगामी काळात २०२४ मध्ये होणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षात होत असलेल्या कुरघोड्यांनी महाराष्ट्रातील अवघे राजकारण ढवळताना दिसत आहे.
देशातील राजकीय परिस्थिती पाहता पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठे बदल होताना दिसत आहेत.आगामी काळात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षित बदल घडत गेले असून सामान्य नागरिक मात्र यांमुळे संभ्रमात पडला आहे. महाराष्ट्रातील मातीत जन्माला आलेल्या राजकीय पक्षांची गत लोचके तोडलेल्या कुत्र्यासारखा झाली आहे. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे पिता बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेना पक्षातून बाहेर पडत राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्रत नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. या घटनेला काही काळ लोटला नाही तोवर पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नंतर शिवसेनेची धुरा सांभाळणारे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमदार खासदार घेऊन भाजप मध्ये प्रवेश केला. या घटनेने शिवसेनेचे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले खरे मात्र अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक आमदार खासदार स्वार्थापोटी एकनाथ शिंदे सोबत भाजपात गेले आणि पुरोगामी महाराष्ट्रातील शिवसेनेचे मावळे कधी टाळूवरील लोणी खाणारे कावळे झाले महाराष्ट्रातील जनतेला समजलेच नाही. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात दोन गट पडल्याचा विसर पडला नाही तोवर पुन्हा एकदा देशातील राजकारणातले चाणक्य समजले जाणारे मातब्बर राजकारणी नेते किंवा राजकारण दर्जी ज्यांना म्हणून ओळखले जाते असे शरदचंद्र पवार यांनी भारतीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडत इ.स. २५ में १९९९ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली. पुढे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय काँग्रेस पक्षासोबत १९९९ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर राहीला. १९९९ मध्ये ज्या पध्दतीने शरदचंद्र पवार यांनी भारतीय काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात महाराष्ट्र पुन्हा एका राजकारणात ढवळाढवळ झाली आणि शरदचंद्र पवार यांचे पुतणे अजितदादा पवार यांनी शिवसेना शिंदे गटाची नक्कल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करूत भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले. अजितदादा पवार यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक आमदार खासदार यावेळी बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणखी एक गट या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाला. या दोन घटनांमुळे अवघा महाराष्ट्र विवंचनेत पडलेला दिसतो आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे सर्व सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक संभ्रमात पडलेले दिसतात. प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण मतदान कोणाला करावे. २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय पक्ष आणि पक्षातील राजकीय नेत्यांची भुमिका पाहता कवी अनंत राऊत यांनी लिहीलेल्या चार ओळी यांना शंभर टक्के लागू होतात म्हणून म्हणावे वाटते. भोंगा वाजलाय, नेता गाजलाय,नेता रयतेचा नाही रे कुणी सगळे एकाच माळेचे मणी, कधी पक्ष ना तत्व बदलतील याची कुणाला नाही रे हमी, कुंकू एकाच्या नावाचं माथी गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय, नेता गाजलाय भोंगा वाजवलाय